पनवेल : तालुक्यातील डोलघर येथील शाळेत विद्यार्थ्यांची संगणकाची गरज ओळखून भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या माध्यमातून संगणक देण्यात आला. डोलघर येथील शाळेला संगणक देते वेळी तारा गावातील चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश हापसे, विद्याधर जोशी, दीपक पाटील, रोशन पाटील, शशिकांत पाटील, लक्ष्मण पाटील, सुदर्शन पाटील, डोलघर येथील जनार्दन कोळी, धनाजी गायकार, विनोद खोत, प्रवीण खोत, राजू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.