उसर्ली (ता. पनवेल) : नैना क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची ग्रामस्थांच्या मागणीनुसार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली व अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी सिडको अधिकारी रवींद्र कुलकर्णी, सतीश मोर्या, उसर्लीचे उपसरपंच गणेश भगत, विचुंबेचे उपसरपंच किशोर सुरते, मच्छिंद्र पाटील, विजय भगत, जयवंत भगत, संजय भगत, सी. के. भोईर, कल्पेश भोईर, अनिल भोईर आदी उपस्थित होते.