
उरण : एनएडी करंजा व अष्टविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी दोन दिवसीय मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन गुरुवारी (दि. 31) जनरल मॅनेजर श्री. पुनीत यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी (दि. 1) चीफ जनरल मॅनेजर के. एस. सी. अय्यर यांची शिबिरात विशेष उपस्थिती होती. सुमारे 270 कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची सामान्य वैद्यकीय तपासणी, नेत्रतपासणी, मधुमेह, रक्तदाब, ईसीजी आदी तपासणी मोफत करून मोलाचे मार्गदर्शन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper