नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय मराठी माध्यम मुख्याध्यापकपदी इंदूताई घरत यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे भारतीय मजदूर संघाचे पनवेल तालुका अध्यक्ष रवी नाईक, कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष मोतीलाल कोळी यांनी अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.