पनवेल : महापालिका प्रभाग 18मधील ठाणा नाका रोड येथील जानव्ही सोसायटीलगत असलेल्या गार्डनची तेथील राहिवाशांच्या मागणीनंतर नगरसेवक नितीन पाटील यांच्या प्रयत्नाने साफसफाई झाली. याबद्दल रहिवाशांनी त्यांचे आभार मानले. या वेळी लीना पाटील, प्रसाद कंधारे, चंद्रकांत पाटील, उमेश इनामदार, महेश सरदेसाई, प्रसाद हनुमंते आदी उपस्थित होते.