पनवेल ः करंजाडे येथील दक्षराज सामाजिक मित्रमंडळाच्या वतीने गुजराती शाळेच्या मैदानात आगरी कोळी कराडी महोत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. 4 ते 15 डिसेंबर पर्यंत असणार्या या महोत्सवास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर आणि वृषाली वाघमारे यांनी रविवारी भेट दिली. या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.