
रोहे ः मुंबईतील ग्लोबल टिचर्स असोसिएशनतर्फे कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. सूर्यकांत आमलपुरे यांना रविवारी (दि. 22) राष्ट्रीय गुरू गौरव विद्यारत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुंबईत रविवारी झालेल्या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. शहा आणि असोसिएशन अध्यक्ष श्री. जगदाडे यांच्या हस्ते प्रा. आमलपुरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. शंकर मुंडे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचार्यांनी प्रा. आमलपुरे यांचे अभिनंदन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper