
पनवेल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती गुरुवारी तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त भोकरपाडा, खानाव, चिंध्रण, देवीचापाडा, किरवले या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शिवजयंती उत्सवास भेट दिली. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, युवा नेते विश्वजीत पाटील, शुभ पाटील आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper