
अलिबाग ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसीलदार (सर्वसाधारण) सतीश कदम, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारीही उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper