
पनवेल : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, मुबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद सुर्वे हे निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा तसेच पिंपरी-चिंचवड येथील हत्या करण्यात आलेल्या विराज जगताप यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन मुंबईकडे परत जाताना येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. या वेळी पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी कमलाकर कांबळे, मच्छिंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अशोक पाटील, ईश्वरचंद पांडे हेही उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper