
पनवेल ः लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे कोप्रोली येथे मंगळवारी गरजू नागरिकांना जीवनावश्यक अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष संजय पाटील, कोप्रोलीचे माजी सरपंच रमेश पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, पनवेल ग्रामीण उद्योग आघाडी संयोजक रोशन पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनंजय पाटील, माजी पोलीस पाटील किसन पाटील, लक्ष्मण पाटील, अंकुश पाटील, सुरेश पाटील, विष्णू फडके, मधुकर पाटील, लक्ष्मण फडके, सुरेश दळवी, गुरुनाथ ठाकूर, रोहित पाटील, पप्पू पाडवी, दत्तू म्हसकर, सावळाराम डांगारकर, चंद्रकांत खोडे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper