
कळंबोली : नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, गटारांवरील झाकणे बसवणे आदी मान्सूनपूर्व कामे तसेच पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबतच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची गुरुवारी येथील सिडको कार्यालयात अधिकार्यांसमवेत बैठक झाली. या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अमर पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, कार्यकारी अभियंता बनकर, कमल कोठारी, प्रकाश शेलार, रामा महानवर आदी उपस्थित होते. परेश ठाकूर यांनी ही कामे वेळेत मार्गी लावावी, असे निर्देश अधिकार्यांना दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper