
सातारा ः रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने ‘रयत’च्या छत्रपती शिवाजी कॉलेज येथे भवन उभारण्यात येत आहे. या नूतन वास्तूचे काम पूर्णत्वास येत असून या कामाची लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रामराजे माने-देशमुख, प्रबंधक डॉ. अरुण सकटे, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गणेश पाटील, विजय जाधव, सौरभ महामुनकर आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper