गव्हाण विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
इयत्ता बारावी बोर्डाची परीक्ष समीप आली असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे असे प्रतिपादन, रयत शिक्षण संस्थे चे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट असणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्या वेळी अध्यक्षपदावरून पदावरून बोलताना अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वृद्धिंगत करून उत्तम यश संपादन करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षकांनीही त्यांना यथोचित सहकार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
या मेळाव्यास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे, संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी, लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, ज्युनिअर कॉलेज प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, जुनियर कॉलेजचे सर्व अध्यापक,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजू खेडकर यांनी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper