कर्जत : बातमीदार
आरपीआय (आठवले गट) शाखा दहिवली आणि उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने कर्जत दहिवली येथे नुकताच ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 213 मजूर, कामगारांनी ई श्रम कार्ड मिळविण्यासाठी नोंदणी केली.
कर्जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरपीआय कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे, कार्याध्यक्ष सुनील काळे, माजी तालुका सचिव मनोज गायकवाड, अॅड. उत्तम गायकवाड, युवानेते किशोर जाधव, विभाग अध्यक्ष संतोष जाधव, माजी नगरसेवक दिपक मोरे, महिला तालुका अध्यक्ष अलका सोनवणे, किशोर गायकवाड उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper