नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडकोच्या 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याकरिता, नागरिकांच्या विनंतीस मान देऊन 24 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोने 26 जानेवारी 2022 रोजी 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेस प्रारंभ करण्यात आला. योजनेकरिता अर्ज करण्यास 24 फेब्रुवारी 2022 ही अंतिम तारीख होती, परंतु कागदपत्रांची जमवाजमवी करण्यास आणि अनामत रकमेची तजवीज करण्यासाठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्याची विनंती नागरिकांकडून करण्यात येत होती. या विनंतीस मान देऊन अर्ज नोंदणी करण्याकरिता 24 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी 24 मार्च 2022 पर्यंत करता येणार आहे. अर्ज व ऑनलाइन शुल्क भरणा 25 मार्च 2022 पर्यंत करता येणार आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी 31 मार्च 2022 रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी 4 एप्रिल 2022 रोजी सिडकोच्या हीींिीं://श्रेीींंशीू.लळवलेळपवळर.लेा/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत 8 एप्रिल 2022 रोजी पार पडणार आहे. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता सिडको नेहमीच कटिबद्ध आहे, असे सिडकोचे एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले आहे.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …