Breaking News

‘पनवेलमध्ये एवढा मोठा मॉल पाहून आश्चर्यचकीत झाले’

पनवेल : प्रतिनिधी

मी माझ्या मामाकडे पनवेलला नेहमी येत असे, पण पनवेलमध्ये एवढा मोठा मॉल आहे याची कल्पना नव्हती. एका मराठी माणसाने उभा केलेला मॉल पाहून आपला ऊर निश्चितच भरून येतो. मराठी माणूस व्यवसायात फारसा पडत नसताना मुंबईच्या प्रवेशद्वारी मॉल संस्कृती रुजवण्याचे कार्य मंगेश परुळेकर यांनी यशस्वी करून दाखवलेले पाहून आश्चर्यचकीत झाल्याचे सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांनी शनिवारी ओरियन मॉलच्या तिसर्‍या वर्धापन दिनी सांगितले.

पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन शनिवारी (27 एप्रिल) साजरा करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता सुप्रसिद्ध अभिनेत्री  श्रुती मराठे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. या वेळी  मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, मनन परुळेकर, मनांकी परुळेकर आणि दिलीप करेलिया उपस्थित होते. या वेळी श्रुती मराठे यांनी मॉलला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्यांना वर्धापन दिनानिमित्त आकर्षक बक्षीस योजना जाहीर करण्यात आली.

2016 मध्ये पनवेल शहराने आपल्याला खूप काही दिले आहे. आता आपण या शहराला येथील जनतेला काही तरी देणे लागतो. या भावनेने मंगेश परुळेकर या मराठी माणसाने ओरियन मॉल बांधला. ओरियन मॉल म्हणजे आज अनेकांचे दुसरे घरच झाले आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, माणगावपासून अलिबागपर्यंतचे अनेक जण सुटीच्या दिवशी येथे सहकुटुंब आवर्जून भेट देत असतात. दीड कोटीपेक्षा जास्त लोकांनी मॉलला भेट दिली आहे. या मॉलमुळे सुमारे 1200 कुशल-अकुशल बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या मॉलमध्ये 60 दुकाने असून हायपर सिटी, शॉपरस्टॉप, रिलायन्स डिजिटल, मॅक्स, टाइम झोन, मॅकडोनल्ड, बारबेक्यूनेशन असे नावाजलेले ब्रँड उपलब्ध आहेत.

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे आपण नेहमी म्हणतो. ओरियन मॉलमधील फूड कोर्टमध्ये तीन वर्षात अनेकांच्या लग्नाच्या गाठी बांधल्या गेल्याने ओरियन मॉल हा तरुणाईचा स्वर्गच आहे. ओरियन मॉल हे आबालवृद्धांना फक्त खरेदीसाठी, खाण्यासाठी किंवा मनोरंजनासाठीचे ठिकाण नसून कोणी प्री वेडिंग शूटिंग करते, कोणी आपल्या संसाराची स्वप्ने येथे रंगवत असतो. लहान मुलांसाठी गेम झोन आणि सिनेमा पाहण्यासाठी पी.व्ही.आर. आहे. यामध्ये जास्तीत जास्त मराठी चित्रपट दाखवले जातात. पनवेलमधील महाविद्यालयीन विद्यार्थीही आपले प्रोजेक्ट येथे बसून पूर्ण करताना दिसतात. गोव्याला जाणारे परदेशी प्रवासीही आवर्जून या मॉलला भेट देतात. या ठिकाणी संस्कृतीचे आणि पर्यावरणाचेही रक्षण केले जाते. गणपतीत ईको फ्रेंडली गणपती बनवले जातात. आर्टिस्ट रूपाली मदन यांनी दिव्यांग मुलांना मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षणही येथेच दिले. मोदक बनवण्याच्या स्पर्धेत भोईर कुटुंबातील चार पिढ्या एकत्र येऊन आपले कलाकौशल्य दाखवून गेल्या आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply