कर्जत ़: प्रतिनिधी
कोंकण ज्ञानपीठ कर्जत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने घाटकोपर मुंबई येथील समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या शिबिरात 45 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, डॉ. सुजाता कुलकर्णी, प्रा. राहुल सुतार, डॉ. एम. ए. शेख या वेळी उपस्थित होते. समर्पण रक्तपेढीच्या प्रकाश ऐवळे, दीपेश सरदार, सागर कांबळे, नितीन जाधव, प्रदीप लोंढे, शुभम जगताप, अभिषेक मोर्या, जोत्स्ना भालेराव, लता देशक, शिला वाघमारे यांनी रक्त संकलनाचे काम केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे विशाल बारिया, निनाद पेंडसे, जय मुंढे, सोनू रसाळ, दीपक ऐनकर, ओंकार रुठे, साहिल वाघ, पौर्णिमा मगरे, सलोनी पांडे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.