पाली ः प्रतिनिधी
दिव-दमण येथे नुकत्याच झालेल्या तिसर्या वेस्ट झोन पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईक यांनी 85 ते 90 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. अंतिम सामन्यात राजस्थानच्या खेळाडूला हरवून अनुज सरनाईकने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या यशामुळे खूप आनंद होत आहे, असे अनुजने सांगितले. अनुजला भारतीय पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर प्रकाश येवले यांचे मार्गदर्शन लाभले. यशामुळे अनुजचे सर्वत्र कौतुक होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper