Breaking News

सोन्याच्या बांगड्या चोरणार्या महिला गजाआड

पनवेल ः वार्ताहर

नवी मुंबईमधील वाशीयेथील तनिष्क ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून दोन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणार्‍या दोन महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

10 दिवसांपूर्वी तनिष्क ज्वेलर्समध्ये 2 महिला दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने गेल्या. प्रथम त्यांनी सेल्सगर्लला बांगड्या दाखवण्यास सांगितले. त्यानंतर ब्रेसलेटची डिझाईन त्यांना दाखवण्यात आली. या दरम्यान त्या दोन महिलांनी 37 ग्राम वजनाच्या सुमारे दोन लाख 21 हजार रुपये किमतीच्या बांगड्या हातचलाखीने गायब केल्या. त्यांनतर कोणतेही सोने खरेदी न करता त्या महिला निघून गेल्या. सदर महिला निघून गेल्यांनतर सेल्सगर्लला दोन बांगड्या कमी असल्याचे निदर्शनास आले. दुकानामधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता त्या दोन बांगड्या सदर महिलांनी लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर बांगड्या चोरणार्‍या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply