पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 येथे भाजप नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या सन 2020-2021 च्या नगरसेवक निधीतून धाकटा खांदा स्मशानभूमीत हायमास्ट, भजन करण्यासाठी निवाराशेड तसेच गावातील प्रवेशद्वाराजवळील हायमास्ट येथे ग्रीलच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 8) करण्यात आला.
या कामांचे उद्घाटन हरिशेठ भगत, वसंत म्हात्रे, रामदास डोंगरे, काशिनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भास्कर भगत, नरेश म्हात्रे, सुनिल पाटील, अमित पाटील, रोशन भगत, रामभाऊ पाटील, रवी डोंगरे, शशी डोंगरे, गणेश पवार, भीमराव पोवार, राकेश म्हात्रे, विनायक म्हात्रे, बाळकृष्ण म्हात्रे, किशोर म्हात्रे, नितेश म्हात्रे, गोवर्धन म्हात्रे, विशाल तांबडे, राहुल भोईर, विनोद भगत, जितेंद्र डोंगरे, जनार्दन भगत आणि आपला नगरसेवक मनोहर म्हात्रे उपस्थित होते.