Breaking News

ज्येष्ठ नागरिक संघात चैत्रगौरी पूजन व महाराष्ट्र दिन साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी कालगणनेनुसार चैत्र महिना हा मराठी वर्षाचा पहिला महिना. वसंत ऋतूची सुरुवात. त्याचेच औचित्य साधून पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त बुधवारी (दि. 1) चैत्र गौरी पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम सचिव जयवंत गुर्जर यांनी़ कुरखेडा (गडचिरोली) येथे झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करून या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली आर्पण केली. त्यानंतर चैत्र गौरी पूजन होऊन सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. कामगार दिनानिमिल माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य दिनाबद्दल माहिती देऊन भजनीबुवा विकास कडू यांनी़ जय जय महाराष्ट्र माझा हे गीत दमदार आवाजात सादर केले. महिलांनी त्यांना साथ दिली. शिवाय याच महिलांनी़ बहु असोत सुंदर संपन्न की महा, वेडात मराठे वीर दौडले सात आदी गीते सामूहिकरीत्या सादर केली. हेमा गद्रे, माधवी कोल्हापुरे, मृणालिनी मोघे, प्रज्ञा सामंत, मोहिनी शिरोडकर, अंजली कानडे, मंदा म्हात्रे, प्रज्ञा बारटक्के, अलका देशमुख, वैशाली कुलकर्णी, शुभांगी कराडकर, दर्शना आठवले, हार्मोनियमवर विकास कडू, ढोलकीवर सुभाष रामधरणे, खंजिरी अनंत नातू, अक्टोपॅड मोहन शिरोडकर, घुंगरू प्रमोद काळे यांनी उत्तम साथ दिली. शेवटी आंबेडाळ व वसंत पेय (पन्हें) वाटप होऊन पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply