विविध रंगांसह पिचकार्याच्या खरेदीसाठी लगबग
उरण ः वार्ताहर
अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या होळी व धुलिवंदनसाठी उरण बाजारपेठ विविध प्रकारच्या रंगांनी तसेच निरनिराळ्या आकाराच्या पिचकार्यांनी सजली आहे.
उरण बाजारपेठ, स्वामी विवेकानंद चौक, आनंद नगर, उरण चार फाटा आदी ठिकाणी रंग व पिचकारी विक्री साठी ठेवण्यात आल्या आहेत. बाजारपेठेत टॅन्क, पंप, कार्टुन, प्रोजन, डोरेमोन, मिकी माउस, स्पायडर मॅन आदी प्रकारच्या लहान- मोठ्या आकाराच्या पिचकार्या विक्रीस आल्या आहेत. नैसर्गिक रंग व एकोफेन्डली रंगाचचे पॅकेट 5 रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
महत्त्वाचा समजला जाणारा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
उरण शहरासह तालुक्यातील स्थानिक आगरी, कोळी भूमिपुत्रांचा असल्याने होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यानिमित्त उरण शहर सह तालुक्यात होळी पेटवत त्याभोवती प्रदक्षिणा घालून प्रार्थना केली जाते.
RamPrahar – The Panvel Daily Paper