रेवदंडा : प्रतिनिधी : मुरूड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यावरील भग्नावस्थेत पडलेल्या 6 तोफा आता लाकडी गाड्यांवर सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सह्याद्री प्रतिष्ठाणच्या वतीने किल्ले कोर्लई येथे बुधवारी (दि. 1) तोफगाडा दुर्गार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी किल्ले कोर्लई पायथ्यापासून गडापर्यंत शिवरायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर सहयाद्री प्रतिष्ठाण-पेण या संस्थेतर्फे देण्यात आलेले सागवानी लाकडांचे गाडे मान्यवरांच्या हस्ते दुर्गार्पण करण्यात आले.तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्यानिमित्त किल्ले कोर्लईच्या पायथ्याशी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाहीर वैभव घरत यांनी पोवाडे सादर केले. यावेळी प्रसिध्द अभिनेते देवदत्त नागे, हिरवळ प्रतिष्ठाण अध्यक्ष किशोर धारिया, राज्य सांस्कृतिक समिती सदस्य शाहीर हेमंतराजे मावळे, अखिल भारतीय ढोल ताशे संघाचे पराग ठाकूर, शिवाजी स्मारक समितीचे सहकार्यवाह सुधीर थोरात, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांची भाषणे झाली. यावेळी नागावचे सरपंच निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्या हर्षदा मयेकर, मांगरूळ सरपंच मंगेश दळवी यांच्यासह प्रतिष्ठाणचे मावळे मोठया संख्येने उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper