मुंबई ः उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय, कारण कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमानही 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मुंबईमध्ये 1956नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा एवढ्या अंशांवर गेला आहे. उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरू नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहनही केले गेले आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper