कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यात वारे येथे होळीच्या सणाच्या निमित्ताने वारे प्रमियर लीग (डब्ल्यूपीएल) आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या आठव्या हंगामातील या स्पर्धेचे विजेतेपद अद्विक इलेव्हन संघाने पटकाविले. वारे येथील तृप्तश्वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील 16 संघांनी व एकूण 176 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये द्वितीय क्रमांक पाटील बॉईज, तृतीय वेदिका इलेव्हन आणि चतुर्थ क्रमांक ओमकार इलेव्हन संघाने मिळविला.