उरण : बातमीदार, प्रतिनिधी
उरण पूर्व विभागातील फ्रेंड्स ऑफ नेचर सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर यांनी शुक्रवारी (दि. 18) धुळवडीच्या दिवशी वन्यजीव आणि पक्षी यांची तहान भागविण्यासाठी चिरनेर पोंडा वनपरिक्षेत्रातील दगड मातीने भरलेला निसर्ग निर्मित झरा पुनर्जीवित करण्याचे महत्कार्य केले. वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी पाणवठा तयार करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पानुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यासाठी संस्थेचे संस्थापक जयवंत ठाकूर, अध्यक्ष राजेश पाटील, शेखर म्हात्रे, राकेश शिंदे, सृष्टी ठाकूर, अनुज पाटील, तुषार कांबळे, प्रणव गावंड, सचिन घरत आणि चरण पाटील या सर्वांनी मोलाचे योगदान दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper