Breaking News

शिवजयंतीनिमित्ताने अन्नदान सप्ताह

नवी मुंबई : बातमीदार

कोपरखैरणे येथील सिद्धीविनायक प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कोपरखैरणे सेक्टर 1 येथील बाल आश्रम, वृद्धाश्रम, झोपडपट्टीतील गरजूंना अन्नदान करण्यात आले. सप्ताहाचे आयोजन करून वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धीविनायक प्रतिष्ठान सदस्यांकडून अन्नदान करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून करोनामध्ये अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍याची उपासमार, तर काहींना अन्न मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे यावर्षी कोपरखैरणे येथील सिद्धीविनायक प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्ताने दरवर्षी सारखी मोठ्या थाटात काढण्यात येणारी मिरवणूक यंदा मिरवणूक न काढता त्यासाठी होणारा खर्च हा अनाथ बालके, वृद्धांना तसेच झोपडपट्टीमधील गरजूंना अन्नदान करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला.  सिद्धीविनायक प्रतिष्ठानच्या वतीने 15 ते 21 मार्चपर्यंत अन्नदान सप्ताह झाला. यामध्ये कोपरखैरणे येथील माहेर आश्रम, स्वीट ऑल्डेज होम वृध्दाश्रम,आधारवड वृद्धाश्रम अपंग संस्था, कोपरखैरणे आणि शहरातील उड्डाणपूल, झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांना आठवडाभर अन्नदान करण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply