शिवक्रांती सामाजिक संस्थेचे श्रमदान
कर्जत : बातमीदार
शिवक्रांती सामाजिक संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कर्जत आणि मुरबाड येथील कार्यकर्त्यांनी विकटगड अर्थात पेब किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली.
संस्थेचे कर्जत विभाग अध्यक्ष अविनाश भोईर, सचिव अमोल पाटील आणि खजिनदार रसिका डुकरे तसेच मुरबाड विभाग खजिनदार समीर घरत यांनी नेरळ येथील हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पेब किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्लास्टिक आणि बाटल्या तसेच कचरा गोळा करून तो नेरळ येथे आणण्यात आला.
शिवक्रांती सामाजिक संस्थेचे अमोल पाटील, समीर घरत, वैभव तलपे, विक्रम रसाळ, यश बाबरे, कल्पेश फराट, भास्कर डोईफोडे, महेंद्र पाटील, मुकुल दळवी, भरत घरत, नयन दिघे, रोहित मार्के, रोशन दळवी, राजेश भवारे यांच्यासह सर्व सदस्यांनी ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी श्रमदान केले.