Breaking News

कचरामुक्त शहर स्पर्धेसाठी कर्जत नगर परिषद सज्ज

कर्जत : बातमीदार

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कंबर कसली आहे. त्यासाठी शहरातील कचर्‍याचे वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी दिवसातून दोनदा कचरा उचलणे तसेच रहिवासी संकुलात कचरा गाड्या फिरत असताना त्यांना जीपीआरएस यंत्रणेने जोडणे ही सर्व कामे करण्यावर कर्जत नगर परिषदेने भर दिला आहे.

कचरा उचलण्याच्या कार्यपद्धतीमुळे कर्जत नगर परिषदेचा देशात बोलबाला झाला होता. 2021 च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कर्जत नगर परिषदेने थ्री स्टार मानांकन मिळविले होते. त्या नामांकनाबद्दल केंद्र सरकारकडून कर्जत नगर परिषदेला आठ कोटींचे अनुदान मिळाले होते. आता 2022 मध्ये फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी कर्जत नगर परिषद सरसावली आहे. कचरा उचलण्याच्या नेहमीच्या कामात आणखी बदल करण्याचे आणि यंत्रणा हायटेक करण्याचे प्रयत्न  नगर परिषदेने सुरु केले आहेत. वर्गीकरण करूनच शहरातील कचरा दररोज उचलला जातो. कचरा घेऊन जाणारी वाहने शहरातील कोणत्या भागात आहेत, याची माहिती कार्यालयातील अधिकार्‍यांना तात्काळ मिळावी यासाठी सर्व कचरा संकलन करणार्‍या वाहनांना जीपीआरएस यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील निवासी संकुलामध्ये कचरा संकलन गाड्या दररोज पोहचतात की, नाही आणि कचरा संकलन होते काय? याची माहितीदेखील आरोग्य विभागाला मिळू शकणार आहे. शहरातील गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणचा कचरा आता दिवसातून दोनवेळा कचरा उचलण्यात येत आहे. शहरातील सर्व कचरा शून्य कचरा डेपोमध्ये पोहचल्यानंतर तेथे रोजच्या रोज कचर्‍यावर प्रक्रिया केली जात आहे. त्यावरदेखील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.

फाईव्ह स्टार नामांकन मिळवून देशातील कचरामुक्त शहर बनण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी कचरा संकलनात हायटेक बदल करीत असून हे बदल शहराच्या विकासाचा भाग बनू पाहत आहे. -डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply