Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते  गुढीपाडव्यानिमित्त विविध शुभारंभ

योग अभ्यास केंद्राचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

गुढीपाडवा सण शनिवारी (दि. 2) सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. या शुभ दिनाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत योग अभ्यास केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन उलवे नोड सेक्टर 17 येथे करण्यात आले होते. या केंद्राचे लोकार्पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी उपस्थितांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

भाजप महिला मोर्चा उलवे नोड 2 व उलवे सेना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, न्हावेखाडीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, अनंता ठाकूर, भाऊ भोईर, आशिष घरत, महिला मोर्चा उपाध्यक्ष सुजाता पाटील, कोपर गाव महिला मंडळ अध्यक्ष जयश्री घरत, उलवे सेना संस्थेचे अध्यक्ष शेखर काशीद, सेक्रेटरी गुड्डू कनोजिया, कार्याध्यक्ष सचिन आवटे, कोषाध्यक्ष संदीप सिंग, कोषाध्यक्ष विकी भिडे, सागर भगत, किरण लोहकरे, अमित झा, भारतीय सामाजिक संस्था उलवे अवधेष महतो, मनोज कुमार मौर्या, गौतम कुमार, जवाहर चौहान, राधाकृष्णा पाठक, मनोज जांगीड, दिनेश अग्रहरी, आशिष शर्मा आदी उपस्थित होते.

चेअरमन व स्कूल ऑफिसचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कॉलेजचे चेअरमन ऑफिस आणि स्कूल ऑफिस गव्हाण-कोपर येथे सुरू झाले आहे. या ऑफिसचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 1) उद्घाटन झाले.

या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगीता भगत, कामिनी कोळी, न्हावाचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उषा देशमुख, सुधीर ठाकूर, आनंता ठाकूर, मदन पाटील, सुजता पाटील, किशोर पाटील, जयवंत देशमुख, भाऊ पाटील, वामन पाटील, विश्वनाथ कोळी, एम. डी. खारकर, रतन भगत, वसंत पाटील, निलेश खारकर, सुहास भगत, भाऊ भोईर, चेअरमन भार्गव ठाकूर, एस. टी. गडदे, अरुण जोशी, मुख्याध्यापिका साधना डोईफोडे, प्रभारी प्राचार्या प्रणिता गोळे आदी उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply