भाजपच्या सचिन चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे वार्ड क्रमांक 9 अध्यक्ष सचिन चौधरी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी सोमवारी (दि. 4) साजरा झाला. त्यानिमित्त वळवली येथे असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम महानोंदणी अभियान राबवले.
या शिबिराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत श्रम कार्डचे वाटप केले तसेच पुष्पगुच्छ देऊन सचिन चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक महादेव मधे, मारुती चिखलेकर, हरिश्चंद्र चौधरी, कृष्णा चौधरी, भगवान भोईर, दीपक पाटील, शशिकांत शेळके, कृष्णा पालेकर, वसंत फुंडे, गुरुनाथ पाटील, कच्चेर भोर्ईर आदी उपस्थित होते.