Breaking News

नेरळ रेल्वे स्थानकामधील अर्धवट अवस्थेतील पादचारी पूल तोडण्यास सुरुवात

कर्जत : बातमीदार

नेरळ रेल्वे स्थानकात दोन नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याने अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पूलाच्या दोन्ही बाजूच खांब जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

नेरळ रेल्वे स्थानकात  2003 मध्ये पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आली होते. मात्र दोन्ही बाजूला सिमेंटचे खांब उभे राहिल्यानंतर त्या पुलाचे काम बंद पडले ते अनेक वर्षे बंद राहिले होते. दरम्यान, नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात आणखी दोन पादचारी पूल नव्याने उभे राहणार आहेत. त्यामुळे नेरळ रेल्वे स्थानकातील अर्धवट स्थितीत असलेला पादचारी पूल जमीनदोस्त केला जात आहे. या पादचारी पुलाचे पिलर काढून टाकण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. त्याचा फलाटावरील प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी कापड बांधण्यात आले आहे.

प्रवाशांना अडचणीचे ठरत असलेल्या पादचारी पुलाचे खांब हटविण्यास सुरुवात झाल्याने नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. नव्याने मंजूर असलेल्या पादचारी पुलाचे आणि सरकत्या जिन्याचे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी केली आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply