खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
भारतीय सैन्य दलातील आर्मी, नेव्ही व एअरफोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सहजसेवा फाउंडेशन तर्फे खोपोलीतील लोहाणा हॉलमध्ये 22 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सैन्य दलातील 28 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे कमांडर सचीन पवार हे शिबिरार्थीना मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात पालकसुध्दा सहभागी होऊ शकतील. कर्जत, खालापूर तालुक्यातील इच्छूक विद्यार्थ्यांनी आगावू नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संस्थेच्या उपाध्यक्षा इशिका शेलार (8788110379), सचिव वर्षा मोरे (9850809971), जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी (9822252934), कार्यवाह बी. निरंजन (9518774494), निलम पाटील (8087435025), अखिलेश पाटील (8237547072) किंवा शर्वरी कांबळे (8087394072) यांच्याशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी केले आहे.