अलिबाग : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद आणि अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 14) अलिबाग शहरात माणुसकी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याला अलिबागकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
आपले आरोग्य सदृढ राहण्यासाठी चालणे हे अंत्यत गरजेचे आहे. चालाल तर चालाल या उद्देशाने गुरुवारी अलिबागमध्ये माणुसकी वॉकेथॉन 2022 चे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग समुद्रकिनार्यावरून या वॉकेथॉन सुरुवात झाली.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखविला. अलिबाग समुद्रकिनार्यावरून संपूर्ण शहरत फिरून समुद्रकिनारी वॉकेथॉनची सांगता झाली.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अलिबाग नगरपालिका मुख्यधिकारी अंगाई साळुंखे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकरी राजेंद्र भालेराव, समाजकल्याण अधिकारी गजानन लेंडी, पशुसवर्धन अधिकारी कदम, गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर साळावकर, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्यासह लायन्स क्लब ऑफ मांडवा, डायमंड क्लब, पोयनाड क्लब, अलिबाग क्लब, श्रीबाग क्लब, रोटरी क्लब ऑफ शिशोर अलिबाग, रोट्रॅक्ट क्लब अलिबाग, सह्याद्री प्रतिष्ठान, स्वातंत्र्याचे शिलेदार प्रतिष्ठान, गडवाट प्रतिष्ठान, सुरभी स्वयंसेवी संस्था, प्रिझम संस्था, स्वयंसिद्ध संस्था, नेहरू युवा केंद्र, माथाडी कामगार संघटना, शिक्षक संघटना, अलिबाग पत्रकार संघटना यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच रायगड जिल्हा परिषद आणि अलिबाग नगर परिषद कर्मचारी या वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले होते.