Breaking News

महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर

पनवेल ःवार्ताहर

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, पनवेल होरायझन, खारघर मिडटाऊन आणि कलंबोली आणि शुभद द ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी गर्भाशयाच्या  कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या दरम्यान खालील ठिकाणी दिलेल्या वेळेत आयोजित केले आहे. या संपूर्ण तपासणी आणि टेस्ट चे रुपये 2500/- होतात परंतु हे शिबीर संपूर्णपणे मोफत असणार आहे याची नोंद घ्यावी असे कळवले आहे. या शिबिरात गाठी याची तपासणी, पँप स्मिअर टेस्ट, स्त्री रोग तज्ञ (गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर) यांकडून तपासणी करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात आपली नावे नोंदवावीत. शिबिराच्या वेळ आणि ठिकाणे; 1) सकाळी 10.30ते 11.30 – अष्टविनायक हॉस्पिटल, सेक्टर 6,  खांदा कॉलनी 2) दु. 12 ते दु. 1 वाजेपर्यंत अंत्यविधी सेवा संस्था, सुकापूर 3) दु. 1.30 ते 2.30 पर्यंत संत रोहिदास विकास मंडळ संचालित जेष्ठ नागरिक कट्टा, आमराई गार्डन, सी के टी कोलेज बाजूला, नवीन पनवेल 4) दु. 3.30 ते 5 – नील आशिमा सोसायटी, सेक्टर 2 ए, प्लॉट नं 15, करंजाडे. पूर्व नाव नोंदणीसाठी रो.रुपेश यादव 9833104487, रो. डॉ. किरण कल्याणकर 8898630831, रो. स्वप्नील गांधी 9833332333, रो. दिलीप महाडिक 8976617404 येथे संपर्क साधावा असेही कळविले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply