पनवेल ः वार्ताहर
प्रभाग 18 चे नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागात अनोखे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. माझा प्रभाग माझा परिवार या अनुषंगाने प्रभागातील समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. याच विषयाला अनुसरून गुरुवारी (दि. 14) प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी चाय पे चर्चा विथ विक्रांत पाटीलचे आयोजन जनसेवा कार्यालयात करण्यात आले होते.
‘एक कप चहासोबत आपल्या समस्यांवर काढू मार्ग’ अशी अनोखे टॅगलाइन याउपक्रमाला देण्यात आले होते. आलेल्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे आणि सूचना विशेष लक्ष देऊन ऐकत होते व सर्व गोष्टी फॉर्मवर नमूद करून घेत होते. रस्ते, नाले, उद्याने, महापालिकेतील कामे, नोकरी आणि शाळा-कॉलेजमधील प्रवेश अशा विविध विषयांवरील सूचनांवर नगरसेवक विक्रांत पाटील यांनी आलेल्या नागरिकांच्या बरोबर चर्चा केली.
नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन करण्याचा ध्यास नगरसेवक विक्रांत पाटील यांनी घेतला आहे, त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper