Breaking News

एलआयसीच्या आयपीओला एवढे महत्व का आहे?

येणार, येणार अशी गेले वर्षभर दवंडी पिटविणाराएलआयसीचा आयपीओ पुढील आठवड्यात येतो आहे. युध्दामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक आर्थिक स्थितीत एलआयसी बाजारात उतरते आहे, यावरून त्याला मिळणार्‍या प्रतिसादाचा आत्मविश्वास दिसतो आहे. भारतातआर्थिक मालमत्तेमध्ये होणार्‍या वाढीच्या या कालखंडात या देशातील सर्वात मोठ्या आयपीओला म्हणूनच महत्व आहे.

भारतातीलआतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात येत आहे. जवळपास प्रत्येकालाच माहीत असणारी इन्शुरन्स (काहींसाठी गुंतवणूक) कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ, जी संपूर्णपणे सरकारच्या मालकीची असून देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी या आपल्या घोषवाक्यामुळं कंपनीचं नांव अगदी लहानांच्या देखील तोंडात येतं. अशा या कंपनीची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी झाली. म्हणजे तब्बल 65 वर्षानी त्या कंपनीत थेट गुंतवणूक करण्याची संधी भारतीयांना मिळते आहे.

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (डएइख) कडे एलआयसीद्वारे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (ऊठकझ) दाखल केला आहे. हामसुदा भारतीय कुटुंबे आर्थिक मालमत्तेमध्ये वाढत्या प्रमाणात कशी गुंतवणूक करत आहेत याबद्दल सर्वसमावेशक अंतर्दृष्टी देते. सन 2012 व 2020 दरम्यान, आर्थिक मालमत्तेतील घरगुती बचत 31% वरून 41% पर्यंत वाढली आहे. भारतीय कुटुंबानं दरवर्षी वाचवलेल्या प्रत्येक 100 रुपयांपैकी जवळपास 10 रुपये एलआयसीकडे गुंतवले जातात, वैयक्तिक विमा पॉलिसीनुसार एलआयसीचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा हा जवळपास 75 टक्के आहे आणि अशाप्रकारे ही भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आणि जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असल्यानं, एलआयसीची बाजारातील नोंदणी भारतीय भांडवली बाजारातील अनेक गोष्टी बदलण्यास भाग पाडू शकते. सुरुवातीला, जेंव्हा एलआयसीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग सुरू करतील तेंव्हा गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ बदलू शकतील कारण अनुभवी गुंतवणूकदारांना विमा बाजारातील दोन तृतीयांश हिस्सा असलेल्या कंपनीकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. सामान्यपणे, जेंव्हा पोर्टफोलिओ बनवले जातात, तेंव्हा मुरलेले गुंतवणूकदार नेहमी एखाद्या क्षेत्रातील प्रमुख कंपनीस प्राधान्य देतात.

एलआयसीमधील गुंतवणूकदारांच्या हितासाठी योगदान देणारं दुसरं कारण म्हणजे आपल्या देशातील जीवन विमा बाजाराचा कमी हिस्सा. एलआयसीचे लाखो विमा ग्राहक असूनही, भारतातील विमा प्रीमियम-ते-जीडीपी गुणोत्तर 3.7 टक्के आहे, जे जागतिक सरासरी 7.23 टक्क्यांपेक्षा निम्मं आहे. याचा अर्थ इतर देशांतील नागरिकांच्या तुलनेत बहुतांश भारतीयांकडे जीवन विमा अपुरा आहे आणि ही गोष्ट येणार्‍या दिवसांत पूरक वाढ दर्शवते.

एलआयसीच्या लिस्टिंगचं तिसरं महत्त्व म्हणजे मापदंड निर्देशांकातील (बेंचमार्क इंडेक्स) संभाव्य बदल. शक्य आहे की एलआयसीचा समावेश लवकरच एस अँडपी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी50 मध्ये होईल.

याबाबतीत चौथा महत्त्वाचा पैलू म्हणजे विमा कंपनीच्या पोर्टफोलिओबद्दल खुलासा करणे. 39 ट्रिलियन रुपयांच्या मालमत्तेसह  संपूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीपेक्षा एलआयसीही सरकारी रोखे आणि इक्विटी मालमत्तांमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार आहे. त्यामुळं केवळ विमा क्षेत्रातील कंपनी म्हणून ग्राह्य न धरता एक गुंतवणूक कंपनी म्हणून देखील या कंपनीकडं पाहता येऊ शकतं. सप्टेंबर 2021 मध्ये कामोणीची शेअरबाजारातील गुंतवणूक ही 10 लाख कोटींच्या घरात होती. एलआयसीचे मालमत्ता व्यवस्थापन (अणच्) 2021 च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे 10 टक्क्यांनी वाढून 37.46 हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे मागील वर्षी 34.14 हजार कोटी रुपये होतं. याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा रु. 2710 कोटींवरून रु.2974 कोटींवर पोहोचला आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या कालावधीसाठी, एलआयसीची एकूण अणच् रु. 40.91 हजार कोटी असून कंपनीनं 1715 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.

एलआयसीही जीवन विमा प्रीमियम (GWP) द्वारे जगातील पाचवी सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असून एकूण मालमत्तेनुसार जागतिक स्तरावर 10 वी सर्वात मोठी विमा कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2021 च्या अखेरीस, एलआयसीचा नवीन व्यवसाय प्रीमियम (NBP) मध्ये 66 टक्के बाजार हिस्सा होता.

‘योगक्षेमं वहाम्यहम्’ (तुमची समृद्धी, आमचे कर्तव्य) – हे भारतीय जीवनविमा मंडळाचं बोधवाक्य आहे जे गीतेमधून घेतलं आहे. मूळ श्लोक असा :

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥ … भगवद्गीता 9-22अर्थ : माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो. देवावर विश्वास असो वा नसो, भूतकाळ हेच सांगतो की लोकांचा एलआयसीवर मात्रप्रचंड विश्वास आहे आणि ज्याची प्रचिती बाजार देईलच.

एका पाहणीनुसार कौटुंबिक बचतीच्या मुख्य भागापेक्षाही मोठा हिस्सा एलआयसीकडं जातो, जो स्टेट बँक ऑफ इंडियामधील ठेवींपेक्षा जास्त आहे. साडेतेरा लाख एजंट्सद्वारा कंपनीनं 290 दशलक्ष पॉलिसी दिलेल्या आहेत याचा फायदा कंपनीस आपल्या समभाग विक्रीस नक्कीच होईल. मागील सहा दशकांपासून भारतीय लोकांशी जोडलेली नाळ गुंतवणूकदारांचा एलआयसी वरील विश्वास दर्शवते आणि हेच प्रामुख्यानं कंपनीचं भांडवल आहे. ऍक्सिस सिक्युरिटीजचे एमडी व सीईओ गोपकुमार म्हणतात, मागील एकाच महिन्यात त्यांच्याकडे सुमारे 45000 डिमॅट खाती उघडली गेली, त्यापैकी 40 टक्के हे शेअरबाजारात नवीन आहेत. यावरून समजून येतं की गुंतवणूकदारांमध्ये एलआयसीच्या आयपीओ बाबतीत किती उत्साह आहे..किरकोळ गुंतवणूकदारांसाठी जरी 35% हिस्सा राखीव ठेवला आहे तरी आयपीओ किती पटीनं ओव्हरसबस्क्राईब होतो यावर शेअर्स लागतील की नाही हे अवलंबून आहे. शुअरशॉट शेअर्स मिळण्यासाठी देखील कांही क्लुप्त्या करणारे आहेतच.

-प्रसाद भावे, अर्थप्रहर

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply