पनवेल ः वार्ताहर
पनवेलमधील प्रगतशील शेतकरी सज्जन पवार यांना रविवारी (दि. 1) रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तहसीलदार विजय तळेकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते तहसीलदार कार्यालयात झाला.
या वेळी कोविड काळात उत्तम कार्य केलेल्या कोविड योद्ध्यांसह विविध क्षेत्रातील सत्कार प्रमाणपत्र देऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास पनवेल प्रांत अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, अपर तहसीलदार शेतजमीन न्यायाधिकरण अभिजित खोले, गटविकास अधिकारी संजय भोये, सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी 1 एन. व्ही. भोये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते, एकात्मिक बालविकास प्रकल अधिकारी पनवेल चेतन गायकवाड उपस्थित होते.
सज्जन पवार यांनी पनवेलमध्ये पहिला स्ट्रॉवबेरीचा यशस्वी प्रयोग राबवला होता तसेच 2020-21 जिल्हा भातपीक स्पर्धेमध्ये तेे तालुक्यात प्रथम आले आहेत. याच स्पर्धेत जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक त्यांनी पटकाविला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper