भाजयुमोचे शहर अध्यक्ष रोहित जगताप यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभुमीजवळ असलेल्या चौकात सिग्नल यंत्रणा सुरू नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या संदर्भात भाजप युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप यांनी मंगळवारी (दि. 10) वाहतुक शाखेच्या पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन सिंग्नल यंत्रणा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले.
पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभुमी समोरील चौकात सिंग्नल यंत्रणा बंद आहे. या सात ठिकाणी जाण्यासाठी एकाच चौकातुक वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यातच अनेक वेळा वाहने समोरा समोर येऊन त्यांचा अघपात होता होता वाचला आहे. विशेषतः सायन पनवेल महामार्गावरील अतिवेगाने येणार्या वाहनामुळे या ठिकाणी अपघात होण्याचा धोकाही निर्माण होत आहे. त्यामुळे येणार्या काळात सिंग्नल यंत्रणा बंद असल्याने मुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडु नये या करीता पनवेल शहर भाजप युवा मोर्च्याच्या वतीने वाहतुक शाखेच्या अधिकार्यांची भेट घेऊन सिग्नल यंत्रणा सुरू करावी या बाबातचे निवेदन देण्यात आले.
या वेळी युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, युवा मोर्चा सदस्य अक्षय सिंग, नितेश घुगे, नूतन पाटील उपस्थित होते.