कळंबोली : रामप्रहर वृत्त : कळंबोलीमधील केएलई कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या सोहळ्यामध्ये लॉ मेहफिल या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. कळंबोलीमधील केएलई कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. लॉ मेहफिल या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला सादर केल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला डायरेक्टर प्रभाकर केरे, प्राध्यापक दिनकर गीते, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विभोरे देणे, सायन्स अॅड कॉमर्स प्राचार्य मोर्या सर, अॅडमिनिस्टर श्री. शेट्टी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …