Breaking News

गडचिरोलीतील माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात?

गडचिरोली ः वृत्तसंस्था

गडचिरोलीतील कुरखेडा येथे महाराष्ट्रदिनी (1 मे) झालेल्या भ्याड माओवादी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव- भीमा हिंसाचारानंतर आता या प्रकरणातही मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 16 पोलीस जवान शहीद झाले होते. त्यानंतर शनिवारी (दि. 4) माओवाद्यांविरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

2018मध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा बदला?

जांभूरखेडा येथे सी-60 कमांडो जवानांचे वाहन जात असताना माओवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात एक चालक आणि 15 पोलीस जवान शहीद झाले आहेत. या स्फोटात कमांडोंच्या गाडीचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. दरम्यान, माओवाद्यांनी केलेला हा हल्ला मागील वर्षीच्या माओवादविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मागच्या वर्षी गडचिरोलीमध्येच माओवादविरोधी कारवाईत 16 माओवादी मारले गेले होते. 22 एप्रिल 2018 रोजी एटापल्लीमध्ये माओवादविरोधी पथकाने ही कारवाई तीव्र केली होती. बोरियाच्या जंगलात माओवादी आणि सुरक्षा यंत्रणांत झालेल्या चकमकीत हे माओवादी ठार झाले होते.

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply