Breaking News

सायक्लोथॉनसंदर्भात जनजागृती रॅली

पनवेल ः रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 5 जून) उलवे नोडमध्ये भव्य सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सायक्लोथॉनचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सीईओ व पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 29) जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत ठाकूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सदस्य भार्गव ठाकूर, अजय भगत, जयवंत देशमुख शेखर काशीद, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, अ‍ॅड. चेतन जाधव, सत्यवान नाईक, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, चिन्मय समेळ, पल्लवी सुर्वे, अनिल सणस, विलास साळवे, श्री. सिंह, अक्षय सिंग, अर्जुन भगत, रोहन माने, अजिंक्य जाधव, यांच्यासह उलवे सेना सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply