Breaking News

खांदा कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आपण समाजाचे काहीतरी देण लातो या भावनेतून नेहमीच मदत कार्य करणारे रायगड जिल्ह्यातील दानशून व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचे वाटप भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 2) करण्यात आले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि नगरसेवक एनकाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्व. संजय भोपी यांच्या जयंत्तीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे खांदा कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. श्री कृपाहॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, खांदाकॉलनी महिला मोर्चा शहर अध्यक्षा राखी पिंपळे,  भीमराव पवार, माजी सरपंच शशिकांत शेळके, प्रभाग अध्यक्ष शांताराम महाडिक, भटके विमुक्त आघाडीचे खांदा कॉलनी शहर अध्यक्ष गोपीनाथ मुंडे, युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, जेष्ठनेते उमेश मांजरेकर, दत्तात्रेय खंडागळे, सुनीता गुरव, कृष्णा पाटील, अविनाश गायकवाड, नवनाथ मेंगडे, अविनाश पाटील, प्रेमा भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगीतले की, रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. ते काम करीत असतातान आपल्यापर्यं सेवेचे अनेक प्रकल्प घेऊन येण्याची संधी आम्हाला मिळत आहे, असे सांगून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना उदंड आयुष्य लाभो असे म्हटले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply