पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होत आहे. या शाळेच्या ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षण मोफत असणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी 15 जूनपर्यंत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्युनियर केजीचा वर्ग यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला असून या वर्गातील विद्यार्थ्यांची क्षमता 40 असणार आहे. पनवेल मनपा इंग्रजी शाळेत तीन किमीच्या परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये प्राधान्य राहील. प्रवेश अर्जही मोफत आहेत. प्रवेश अर्ज भरताना बालकाचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड, पालकांचे पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, विज बील, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, रेशनिंग कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, भाडे तत्वावर राहणार्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून घेण्यात येईल.
ज्युनियर केजीमध्ये प्रवेश घ्यावयाच्या बालकाचा जन्म 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान झालेला असावा. प्रवेश अर्ज तसेच अधिक माहितीसाठी अनिता दसवते (9920215647), प्राजक्ता महाडिक (9594091050) यांच्याशी संपर्क साधावा.
- प्रवेश अर्ज भरण्याचा सुरुवातीचा दिनांक : 9 जून 2022 सकाळी 10 वाजल्यापासून.
- प्रवेश अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक : 15 जून 2022 सायंकाळी 6 वाजेपर्यंत.
- लॉटरीचा दिनांक व वेळ : 23 जून 2022 दुपारी 3 वाजता.
- प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण : पीर करमअली शाह उर्दू शाळा क्र. 10, पाटकर वाडा, देवाळे तलावासमोर, महापालिका मुख्यालयाजवळ पनवेल.