पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका असलेला वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे. संस्थेचे बोधचिन्ह असलेल्या व विद्यालयाच्या प्रांगणात बहरलेल्या वटवृक्षाचे पूजन करून, वटवृक्षास जलप्रदान करून पूजन करण्यात आले. प्राचार्य साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष संवर्धनाचा संदेश देऊन वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर व इतर महिला सेविका उपस्थित होत्या.