Breaking News

पतीसमोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार

राजस्थान ः वृत्तसंस्था

राजस्थानमधील अलवर येथे महामार्गावर एका विवाहितेवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमांनी बलात्कार करतानाचा व्हिडीओदेखील तयार केला असून हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्या नराधमांनी पीडित विवाहितेला दिली होती.

अलवर जिल्ह्यात राहणारी विवाहिता 26 एप्रिल रोजी तिच्या पतीसोबत तालावृक्ष येथे दुचाकीवरून जात होती. यादरम्यान थानागाजी-अलवर मार्गावर पाच तरुणांनी त्यांना गाठले. त्यांनी दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला. यानंतर त्यांनी दाम्पत्याला निर्जनस्थळी नेले. तिथे त्यांनी महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी या घटनेचा व्हिडीओ तयार केला. या घटनेची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करू आणि ठार मारू, अशी धमकी नराधमांनी दिली. पाच ते सहा दिवस दाम्पत्याने भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दिली नाही, मात्र यानंतरही नराधमांनी पीडित महिलेच्या पतीला फोन करून धमकी देणे सुरूच ठेवले.

अखेर सोमवारी पीडितेने पोलीस ठाणे गाठले आणि नराधमांविरोधात तक्रार दिली. नराधम एकमेकांना छोटेलाल उर्फ सचिन, जीतू आणि अशोक या नावाने हाका मारत होते, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. जवळपास अडीच तास महामार्गालगत हा सर्व प्रकार सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणी अपहरण, बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा …

Leave a Reply