Breaking News

ही अन्यायाविरुद्धची क्रांती आहे -संतोष भोईर

कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

आपल्या आमदारांनी शिवसेना सोडली नाही, ते शिवसेनेतच आहेत. ही अन्यायाविरुद्धची क्रांती आहे. त्यामुळे त्यांना आपण समर्थन केले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारससंघ संघटक संतोष भोईर यांनी केले.

कर्जत तालुक्यातील शिरसे येथील राधमाई मंगल कार्यालयाच्या सभागृहात आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संतोष भोईर बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पक्ष संपुष्टात आणला आहे, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

कर्जतचे उपशहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असताना पहिल्यांदाच निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यात आले, त्यांनी  जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी देताना दूजाभाव केला. तिथपासून खदखद होती. पक्षश्रेष्ठीसुद्धा न्याय देत नव्हते,  त्यामुळे हा प्रकार घडला, असे सुर्वे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पूजा थोरवे, मनोहर पादीर, तालुका संघटक शिवराम बदे, खोपोली शहर संघटीका सुरेखा खेडकर, खोपोली शहर प्रवक्ते तात्या रिठे,  डॉ. हेमंत पाटील, पंकज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विशे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, खालापूरच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना मोडवे, गटनेते किशोर पवार, खोपोली शहर उपशहर प्रमुख संदीप पाटील, महिला संघटीका प्रिया जाधव, नेरळ सरपंच उषा पारधी, शिवानी पोतदार, राहुल विशे, माजी तालुका प्रमुख रमेश मते, संदीप भोईर यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply