कामगार नेते सुरेश पाटील यांचा सत्कार
उरण : बातमीदार
रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये चालू शैक्षणिक वर्षाची विद्यालयाची स्कूल कमिटीची व सल्लागार समितीची सभा विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ जगे यांच्या अध्यक्षतेखाली व कामगार नेते सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी कामगार नेते सुरेश पाटील यांची अखिल भारतीय पोर्ट ऑथॉरिटीच्या वेतन सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे लाईफ वर्कर यांनी विद्यालयाच्या विकासाच्या सुविधांचा आढावा घेतला, तसेच विद्यालयाच्या अडचणी विषयी चर्चा करण्यात आली. यासोबतच सल्लागार समितीचे सदस्य डी. आर. ठाकूर यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी, बारावी कला व विज्ञान विभागात प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी सल्लागार समितीचे सदस्य नरेश घरत, अविशेठ पाटील, यशवंत घरत, अमृत ठाकूर, रघुनाथ ठाकूर, बाळासाहेब पाटील, मधुकर पाटील, प्रभाकर मुंबईकर, जे. सी. घरत, हिरामण पाटील आदी उपस्थित होते. शेवटी रयतसेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक नुरा शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.