Breaking News

रोह्यात पावसाचा जोर कायम

रोहे : प्रतिनिधी

शहरासह रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असल्याचे सोमवारी (दि. 11) दिसून आले आहे. सोमवार सकाळपासून अधुनमधून पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. वातावरण ढगाळ होते.

जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतीला अनकूल पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे जोरात सुरू आहेत.

रोहा तालुक्यातील मेढा, सानेगाव, चणेरा, घोसाळे, धाटाव, कोलाड, सुतारवाडी, खांब, देवकान्हे, पिंगळसई आदी परिसरात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे.डोंगर-दर्‍यातून नदी, नाले भरुन वाहत आहेत. कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी सायंकाळी कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली होती.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply